आपले स्वागत आहे
पहाटे ५.०० - मंदिराचे दरवाजे खुले
पहाटे ६.०० - श्रींचा अभिषेक
सकाळी ७.०० - श्रींची आरती
दुपारी १२.०० - श्रींचा नैवेद्य व श्रींची आरती
दुपारी १२.१५ - प्रसाद वाटप
सायंकाळी ७.०० - श्रींची आरती
रात्री ८.०० - श्रींची शेजारती
रात्री १०.०० - मंदिर बंद
श्री. क्षेत्र पैजारवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे गुरुवार दि. १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न होत आहे.
या दिवशी श्री ना. रुद्राभिषेक, दत्तयाग, होम हवन, त्रिकाल आरती व सद्गुरुंचे दर्शन. दुपारी १२ ते ३ महाप्रसाद.
तरी भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
– श्री. बाबासाहेब दत्तात्रय चव्हाण (अध्यक्ष)
सकाळी ७.०० वाजता
दुपारी १२.०० वाजता
संध्याकाळी ७.०० वाजता
आपल्या सर्वांच्या योगदानाने समाजोपयोगी कार्य आणि मंदिराचा विकास होत आहे.तरी आपण आपले योगदान देऊन इतरांनाही यामध्ये सहभागी होण्यास सिद्ध करावे.
आपण बँक ट्रान्सफरद्वारे देणगी दिल्यानंतर, कृपया आम्हाला ९३२२००३६७७ या क्रमांकावर कळवावे.
आपल्या समर्पित देणगीमुळे मंदिर परिसराचा विकास, धार्मिक उत्सवांचे आयोजन आणि समाजोपयोगी कार्य सुरू ठेवण्यास मदत होते.आम्ही आपल्या सहकार्याबद्दल कृतज्ञ आहोत.
श्री क्षेत्र पैजारवाडी येथील श्री चिले महाराज समाधी मंदिर हे कलेचे भव्य कासवाकृती मंदिर आहे. येथील वातावरण अतिशय शांत आणि ध्यानमय आहे. मंदिराजवळ भक्तनिवास आणि दैनिक सुविधा उपलब्ध आहेत.
श्री. क्षेत्र पैजारवाडी येथील दैनिक कार्यक्रम आणि साजरे करण्यात येणारे उत्सव
दर गुरुवारी सकाळी सहा वाजता अभिषेक व विशेष पूजा आरती केली जाते.
दर अमावस्येस अभिषेक व विशेष पूजा आरती व महाप्रसाद वाटप १२ ते ४ वाजेपर्यंत केले जाते. सायंकाळी ५ ते ६ पालखी सोहळा पार पाडला जातो. दर पोर्णिमा, गुरूवार व रविवार विशेष पूजा, आयोजित केले जाते.
महाशिवरात्रीस औदुंबर ते पैजारवाडी माऊली प्रणित पायी दिंडीत उत्साहपूर्ण आनंद सोहळा संपन्न होतो.
सदगुरू श्री चिले महाराजांचा जन्मोत्सव - गोकुळाष्टमी
अखंड नामवीणा गुरुचरित्र पारायण (भजन,कीर्तन,प्रवचन,धार्मिक कार्यक्रम)
श्री गुरुदेव दत्त वारकरी वाड्मयसेवा मंडळ नृसिंहवाडी ते पैजारवाडी पायी दिंडीत व दर अमावस्येस कोल्हापूर ते पैजारवाडी पायी दिंडीत लोकसहभाग असतो.
जुलै ते ऑक्टोबर पावसामुळे अमावस्या पालखी सोहळा बंद
आषाढ शु || प्रतिपदा ते आषाढ शु || एकादशी
आमच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा
।। हरि विठ्ठला, हरि विठ्ठला पांग फिटला, पांग फिटला चिले महाराज मला गुरु भेटला ।।
श्री चिले महाराज कृपांकित सश्रद्ध भक्तांना सस्नेह प्रणाम,
शतसावंत्सरिक महोत्सव, मंदिर विस्तार कार्य व श्रीसदगुरु चरित्र इत्यादिसाठी देणगी दिल्यानंतर आपले काम संपले, आपण सुटलो असे प्रत्येकालाच वाटते। पण ही वस्तुस्थिती तशी मुळीच नसते। येथील दैवी कार्याला हातभार लावून आपण जशी चिले महाराजांची कृपा व धन्यवाद मिळविता तसेच या कारणाने आपले व आमचे एक कायमचे अतूट नाते निर्माण होत असते. हे संबंध तात्पुरते नसून उलट कैकपटीने वर्धिष्णू होत असतात. आमचे कार्य हे आपलेही कार्य ठरते. या कार्याचे तुम्हीही एक अविभाज्य घटक बनत असता. आपले स्वतःचे यापुढे सर्व लक्ष, सर्व प्रकारे या कार्याकडेच लागले पाहिजे. हे कार्य हेच आपलेही ध्येय ठरले पाहिजे. विश्वस्त मंडळ जे काम करीत आहे त्याला सर्व ज्ञात-अज्ञात चिले भक्तांनी या अलौकिक कार्यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन आनंद घ्यावा. जर असे झाले तरच हे दान सुफल झाले असे वाटेल... धन्यवाद! श्री चिले महाराजांचे कृपाशीर्वाद आपणा सर्वाना आहेतच! ते वृद्धिंगत होवोत.
श्री चिले महाराज ट्रस्टचे कार्यकारी सदस्य
अमेरिकन काँक्रिट इन्स्टिट्यूटतर्फे दिला जाणारा भारतीय स्तरावरील 'आऊटस्टैंडिंग स्ट्रक्चर ऑफ दि इअर'चा पुरस्कार येथील प्रसिद्ध वास्तुविशारद प्रमोद बेरी यांना इन्स्टिट्यूटचे जागतिक अध्यक्ष डॉ. मायकल डिक्सन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.